नराधम बापाने सतत आठ महिने केला बलात्कार father rape her girl

नराधम बापाने सतत आठ महिने केला बलात्कार

नराधम बापाने सतत आठ महिने केला बलात्कार
www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई

नवी मुंबईच्या दिघा येथे एका पित्यानेच आपल्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून ४० वर्षीय बाप हा आपल्या १६ वर्षाच्या मुलीवर सतत बलात्कार करत होता. या बाबत रबाळे पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली आहे.

संबंधीत मुलगी लहानपणापासून आपल्या आजी आजोबांकडे राहत होती. घरात सगळ्यात मोठी असलेली मुलगी, गेल्या आठ महिन्यांपासूनच आपल्या घरी रहायला आली होती. या आठ महिन्यांपासून घरात कोणीही नसताना, वडीलांकडून मुलीचं दरवेळी शारिरीक शोषण व्हायचं. हा प्रकार मुलीने आपल्या आईला सांगून देखील आईने नेहमीच या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं.

अखेर शेजाऱ्यांनी मुलीची व्यथा जाणून घेऊन, मुलीसोबत रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. सध्या तरी या प्रकरणाबाबत पोलीस कसून चौकशी करत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 30, 2014, 11:00


comments powered by Disqus