मरीन ड्राईव्हवर सापडला महिलेचा मृतदेह, female body found on marine drive

मरीन ड्राईव्हवर सापडला महिलेचा मृतदेह

मरीन ड्राईव्हवर सापडला महिलेचा मृतदेह
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बुधवारी सकाळी मरीन ड्राइव्ह समुद्र किनाऱ्यावर एका महिलेचा मृतदेह आढळून आलाय. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.

मृतदेह सापडल्याचं पोलिसांना समजताच ते तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. महिलेचं वय २८ ते ३० च्या दरम्यान असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय.

मृत शरीरावर कोणत्याही प्रकारच्या मारहाणीच्या किंवा जखमेच्या खुणा नाहीत. त्यामुळे या महिलेचा बुडून मृत्यू झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. हा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी जी टी हॉस्पीटलमध्ये पाठवण्यात आलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, September 4, 2013, 12:45


comments powered by Disqus