...त्यांनी आपलं बाळ बॅगेत भरून टाकलं रेल्वेत FETUS FOUND IN BAG AT WADALA STATION

...त्यांनी आपलं बाळ बॅगेत भरून टाकलं रेल्वेत

...त्यांनी आपलं बाळ बॅगेत भरून टाकलं रेल्वेत
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईच्या लोकलमध्ये एक बेवारस पडलेली बॅग एका नेलपॉलिश विक्रेत्यानं एक बॅग पळवली. पण बॅग उघडल्यावर मात्र त्याची बोबडीच वळली आणि त्यानं पळ काढला... का काढला त्यानं पळ? असं काय होतं त्या बॅगेत.... एखाद्या सिनेमात शोभेल असा हा प्रकार प्रत्यक्षात घडलाय... आणि अखेर एका निरागस जिवाला जीवदान मिळालं..

अवघं पंधरा दिवसाचं आयुष्य पाहिलेला एक जीव... बाळाला त्याच्या आयुष्यात होत असलेल्या उलथापालथींची कल्पनाही नव्हती... हे बाळ सध्या डोंगरीच्या आशा सदन या बालगृहात आहे.. कोणीतरी या बाळाला पुढचा प्रवास नियतीच्या हाती सोपवत हार्बर लाईनवरून सुटणाऱ्या बेलापूर गाडीत बॅगेत भरून सो़डून दिलं होतं. ही बँग एका नेलपॉलिश विकणाऱ्या एका फेरीवाल्याच्या नजरेस पडली. बॅगेत काही चीजवस्तू असेल या आशेनं त्यानं ती पळवली. कुर्ला स्टेशनवर तो उतरला.

मात्र उत्सुकते पोटी त्यानं ती बॅग उघडली असता त्यानी बाळाचा हात बाहेर आला. घाबरुन तिथंच बॅग टाकून त्यानं पळायचा प्रयत्न केला. मात्र एका तिकीट चेकरनं त्याला पकडलं. बॅग संपूर्ण उघडली असता त्यातून सुखरुप बाहेर पडलं हे बाळ... मग सुरु झाला पोलीस तपास आणि वडाळा स्थानकाच्या हद्दीत हा प्रकार घडल्याने या बाळाचा ताबा कुर्ला पोलीसांनी हे बाळ वडाळा रोड पोलिसांच्या ताब्यात दिलं.

विक्रेत्यानं लोभापायी बँग लगेच उघडली म्हणून हे बाळ वाचलं. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे अजून दहा मिनिटं हे मुल बॅगेत राहीलं असतं तर त्याचा मृत्यू झाला असता. पण या बाळाला अखेर जीवदान मिळालयं. आता या मुलाच्या पालकांचा शोध सुरु आहे.


व्हिडिओ पाहण्यासाठी -



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ




First Published: Tuesday, January 28, 2014, 14:19


comments powered by Disqus