Last Updated: Monday, February 18, 2013, 19:28
www.24taas.com, मुंबईमुंबई महापालिकेत समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींना कंत्राट देण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. कचरा उचलण्याचं कंत्राट अबू आझमींच्या ‘गल्फ हॉटेल कंपनी’ला देण्यात आलं आहे.
हे कंत्राट 168 कोटी रुपयांचं आहे. स्थायी समितीत या कंत्राटाला मंजुरी देण्यात आली. मात्र मनसेचा अबू आझमींच्या कंपनीला कंत्राट द्यायला विरोध आहे.
तर कायद्याच्या चौकटीत बसत असल्य़ानंच आझमींच्या कंपनीला कंत्राट देण्यात येत असल्याचं आयुक्तांचं म्हणणं आहे.
First Published: Monday, February 18, 2013, 19:28