Last Updated: Tuesday, March 5, 2013, 08:13
www.24taas.com, गोरेगाव मुंबईतल्या गोरेगाव फिल्मसिटीमध्ये मंगळवारी रात्री उशीरा आग लागली.
बोरिवली नॅशनल पार्कच्या परिसरातल्या जंगलात ही आग लागली आणि नंतर ती फिल्मसिटीमध्ये पोहचली. सुमारे १० ते १५ किलोमीटर परिसरात ही आग पसरल्याची, माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय. फिल्मसिटीमध्ये अनेक चित्रपट तसेच मालिकांचे तयार सेट आहेत. या सेटपर्यंत ही आग पोहचू नये, याची अग्निशमन दलानं विशेष खबरदारी घेतली. पण, एव्हाना ‘सपनों से भरे नैना’ या मालिकेच्या सेटला आग लागली होती. या आगीत मालिकेचा सेट जळून खाक झाला आहे.
फायर ब्रिगेडच्या दोन गाड्यांच्या मदतीनं ही आग विझवण्यात आली. दोन ते तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात यश आलं. आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
First Published: Tuesday, March 5, 2013, 08:09