Last Updated: Friday, May 10, 2013, 22:54
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबईतल्या नरिमन पॉईंटजवळच्या इन्कम टॅक्स ऑफिसच्या इमारतीला रात्री आग लागली. इन्कमटॅक्स ऑफिसच्या सहाव्या मजल्याला ही आग लागली.
आगीत अनेक महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. अग्नीशमन दलानं तातडीने धाव घेत ही आग आटोक्यात आणली... ही आग नेमकी कशामुळे लागली याच कारण अद्याप कळालेलं नाही.
इन्कम टॅक्स ऑफिसच्या इमारतीला लागलेल्या आगीतमध्ये अजून किती नुकसान झाले आहे याबाबत माहिती उपलब्ध झालेली नाही. तरी काही कंपंन्यांच्या व्यवहाराचे गुप्त कागदपत्र जळून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 10, 2013, 10:00