मुंबईतील वांद्रे येथे आगीत १०० झोपड्या खाक, fire in Mumbai

मुंबईतील वांद्रे येथे आगीत १५० झोपड्या खाक

मुंबईतील वांद्रे येथे आगीत १५० झोपड्या खाक
www.24taas.com,मुंबई

वांद्रे भागातील शास्त्रीनगर झोपडपट्टीत बुधवारी रात्री उशीरा लागलेल्या आगीत १५० झोपड्या जळून खाक झाल्यात तर १५ जण जखमी झालेत. अग्निशमन दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी तैनात पोहोचल्या. मात्र, आग पहाटे आटोक्यात आणण्यात यश आले.

या आगीत झोपडपट्टी धारकांकडील असलेल्या घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग अधिकच भडकली. सिलिंडरच्या स्फोटामुळे परिसरात घबराट पसरली.
आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचे आठ जवान जखमी झाले. रेल्वे स्थानकाला लागूनच या झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. या भागातील रहिवाश्यांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.

First Published: Thursday, March 7, 2013, 11:51


comments powered by Disqus