Last Updated: Thursday, August 29, 2013, 08:20
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईगॅंगवारमधून डॉन छोटा शकीलचा जवळचा आणि डी कंपनी संबंधीत आणि बुकी, इस्टेट एजंट अजय घोसालीया तथा अजय गांडा याच्यावर मालाड लिंकिंग रोडवर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. त्याला तीन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच आलेय.
दुपारी चारच्या सुमारास लिंकिंग रोडवरील इन्फिनिटी मॉलमधून अजय बाहेर पडला असता राखाडी रंगाच्या इनोव्हा कारमधून एक तरुण उतरला. त्याने अजयवर समोरून पाच गोळ्या झाडल्या. त्यापैकी तीन गोळ्या लागल्या. गोळ्या झाडून हा तरुण धावतच गाडीत बसला आणि गोरेगावच्या दिशेने पसार झाला. गाडीत आणखी दोन तरुण होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. यापाठीमागे गॅंगवारचा हात आहे का, याचीही माहिती घेतली जात आहे.
या प्रकाराने मालाड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी बांगूरनगर पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात हत्येचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. गुन्हेगारी जगताला अजय गांडा हे नाव नवे नाही. बुकी आणि इस्टेट एजंट असलेल्या अजयचे एका पोलीस अधिकाऱ्या घनिष्ठ संबंध होते.
डोळा अंडरवर्ल्डवर अंडरवर्ल्ड टोळीने हा हल्ला केला असावा. या टोळीला अजयच्या हत्येची सुपारी मिळाली असावी किंवा प्रतिस्पर्धी टोळीला शह देण्याच्या चढाओढीत स्वत:हून एखाद्या टोळीने हा हल्ला घडवला असावा, या तर्कांवर पोलिसांचा तपास सुरू आहे. सीसीटीव्ही चित्रण मिळविले आहे. त्यामुळे हल्ल्याची माहिती मिळण्यास मदत होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, August 29, 2013, 08:12