लाचखोर IPS ए. के. जैन यांना पाच वर्षांची शिक्षा five years jail to IPS AK Singh

लाचखोर IPS ए. के. जैन यांना पाच वर्षांची शिक्षा

लाचखोर IPS ए. के. जैन यांना पाच वर्षांची शिक्षा
www.24taas.com, मुंबई

1999 मधील लाचखोरी प्रकरणी IPS अधिकारी ए.के. जैनला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच दीड लाखांचा दंडही ठोठावण्यात आलाय. मुंबई सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

जैन यांच्याविरोधात जैन यांचे कनिष्ठ पोलीस अधिकारी संजीव कोकीळ यांनी लाचखोरीची तक्रार दाखल केली होती. 13 वर्षे या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. त्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर ए. के. जैन यांच्यावर कारवाई करण्यात आली.


ए.के. जैन सध्या DIG पदावर कार्यरत आहेत. तक्रारकर्ते संजीव कोकीळ यांना अतिक्रमणविरोधी कारवाईचा फटका बसल्याने त्यांना सेवेतून कमी करण्यात आलं होतं.

First Published: Wednesday, April 10, 2013, 20:51


comments powered by Disqus