Last Updated: Saturday, April 27, 2013, 11:48
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई २५ वर्षीय फोर्सवन कमांडोने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. दरम्यान, लग्न ठरलेले असताना का आत्महत्या केली याचे अद्याप कारण समजू शकलेले नाही.
नंदलाल सोनावणे हा गेल्या वर्षभरापासून कलिना येथे प्रशिक्षण घेत होता. गुरूवारी रात्री काही सहकाऱ्यांसह तो कलिना पोलीस कॅम्पस बिल्डिंगच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेला. रात्रभर तो अस्वस्थ होता. शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्याने स्वत:वर छातीत गोळी झाडून आत्महत्या केली.
गोळी झाडण्याच्या आवाजाने इतर सहकारी जागे झाले असता त्यांना नंदलाल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. धुळ्यातील शिर्के गावातील रहिवासी असलेला नंदलाल सोनावणे दोन वर्षांपूर्वी पोलीस दलात दाखला झाला होता. वर्षभरापूर्वी त्याची निवड फोर्स वन या महाराष्ट्रातील सर्वोच्च सुरक्षा पथकात झाली होती. १२मे रोजी ते तो विवाहबद्ध होणार होता. विवाहासाठी सुटी मिळत नसल्याने तो निराश होता.
मात्र त्याच्या मोबाईलवर सापडलेल्या एका मेसेजमुळे पोलीस आणि त्याच्या सहकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आई- वडील चांगले आहेत, मित्रही चांगले आहेत पण मीच पापी आहे, असा मेसेज सोनावणेच्या मोबाईलमध्ये मिळाला होता.
First Published: Saturday, April 27, 2013, 11:48