Last Updated: Wednesday, September 25, 2013, 20:40
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी मात्र यापुढं लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केलीय.
राम नाईक उत्तर मुंबईतून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. तसंच तीन वेळा आमदार आणि केंद्रात मंत्रिपदही त्यांनी भूषवले आहेत. मात्र यापुढंही भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार असल्याचं स्पष्ट केलंय.
एकीकडे मनोहर जोशींना पंचाहत्तरी ओलांडूनही निवडणूक लढवण्याचा मोह आवरत नाहीये. तर दुसरीकडे राम नाईकांनी मात्र काळाची पावलं ओळखून स्वेच्छा निवृत्ती जाहीर केलीय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, September 25, 2013, 20:40