Last Updated: Monday, March 18, 2013, 13:22
www.24taas.com,मुंबईवडाळ्यातील एका श्रींमतांच्या वसाहतीत एका फ्लॅटमध्ये चार जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पती, पत्नी आणि दोन मुलांचे हे मृतदेह आहेत. हा आत्महत्येचाच प्रकार असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
वडाळा भक्तीपार्क येथील ओडीसी इमारतीत चार जणांचे मृतदेह आढळलेत. दोन्ही मुलांच्या तोंडाला पिशव्या बांधण्यात आलेल्या आहेत. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
डोनॅटो अँथोनी, लिझी, बाबीत आणि जेसन, अशी या चौघांची नावे आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलाय. या कुटुंबाबाबत नातेवाईकांकडून तसेच शेजाऱ्यांकडून माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं. मात्र, या मागचे नेमकं कारण समजू शकलेलं नाही.
First Published: Monday, March 18, 2013, 13:08