Last Updated: Wednesday, October 31, 2012, 11:59
www.24taas.com, मुंबईभाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचं नितीन गडकरींनी आज सांगितलं. त्यांच्यावर गैरव्यवहारांचे आरोप झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत आले आहेत. आपण कुठलंही चुकीचं काम केलं नसल्याचं गडकरींनी आज भाषणात म्हटलं आणि भाजपनेही गडकरींच्या पाठिशी ठाम उभे असल्याचा संदेश दिला.
गडकरी आपल्या भाषणात म्हणाले, की आपल्याकडे केवळ १२.५ कोटी रुपये इतकीच संपत्ती आहे. आपल्याकडे पूर्तीचे १२ हजार शेअर्स असून त्यातून आपल्याला बराच फायदा होत आहे. माझ्याकडे आणि माझ्या कुटुंबाकडे पूर्तीचे १ लाख रुपयांचे शेअर्स आहेत. मी नेहमीच शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम केलंय. माझ्यावर करण्यात येत असलेले आरोप निराधार असून मी कुठल्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार आहे, असंही गडकरींनी आज म्हटलं.
आपल्यावर झालेल्या शरद पवार आणि अजय संचेती यांच्याशी असलेल्या भागीदारीचे आरोप खोटे आहेत. माझा त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. मला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. असं गडकरी म्हणाले. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले होते.
First Published: Wednesday, October 31, 2012, 11:59