मूकबधिर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार gang rape on holy deaf girl

मूकबधिर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मूकबधिर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई

नवी मुंबईतील कोपरखैरणेजवळ नकोडे येथे एका मूकबधिर मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. बलात्कार पीडित मुलगी अल्पवयीन आहे.

मूकबधिर पीडित मुलगी आपल्या घरात एकटीच असताना दोन तरुणांनी घरात घुसून मुलीवर सामूहिक बलात्कार केला. सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास हा प्रकार घडला. नकोडे येथील ही १७ वर्षाची मुलगी घरात एकटीच असल्याचं हेरून दोन तरुण जबरदस्तीनं तिच्या घरात घुसले. याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पीडित मुलगी तिच्या आई, वडील आणि बहिणीसोबत राहते. आई वडील घरी आल्यावर मुलीने घडलेला प्रकार घरात सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी कोपरखैराणे पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणी मुलीची वैद्यकीय चाचणी करून तक्रार नोंदवून घेतलीय.

या प्रकरणात पोलिसांनी याच परिसरात राहणाऱ्या एकाला ताब्यात घेतलंय. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेला व्यक्ती हा मुलीच्या ओळखीचा असून, दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 18, 2014, 12:42


comments powered by Disqus