Last Updated: Saturday, September 28, 2013, 09:35
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई मुंबई पोलिसांनी ओशिवरा परिसरातल्या एरा पबमध्ये सुरु असलेली गे रेव्ह पार्टी उधळलली आहे. पोलिसांनी या पबवर रात्री १ च्या सुमारास धाड टाकून ३१ जणांना अटक केली. यामध्ये चार तरूणींचा समावेश आहे.
गे रेव्ह पार्टीत एका अमेरिकन आणि जर्मन नागरिकाचाही समावेश आहे. शिवाय ४ तरुणींनाही पोलिसांनी अटक केली आहे. मोबाईलवरुन एसएमएसच्या मार्फत या पार्टीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर इथं पोलिसांनी धाड टाकली.
मद्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचं पोलिसांना आढळले आहे. पोलिसांना या पबमधून काही वस्तू मिळाल्या आहेत. ज्यावरुन या पार्टीत अंमली पदार्थांचं सेवन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय पार्टीसाठी मोठ्या प्रमाणात ड्रॅग्सचा वापर झाल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.
यासाठी अटक करण्यात आलेल्या सगळ्यांची मेडिकल चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीनंतर ड्रॅग्ससेवनाबाबत अधिक चित्र स्पष्ट होणार आहे. या सर्वांना तपासणीसाठी कुपर रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, September 28, 2013, 09:25