जर्मन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचे चित्र जारी, German Girl Rape Case Suspect Sketch

जर्मन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचे चित्र जारी

जर्मन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचे चित्र जारी
www.24taas.com, मुंबई

मुंबईतल्या वांद्रे परिसरात जर्मन मुलीवर झालेल्या बलात्कार आणि चोरीच्या घटनेतील संशयित ओरोपीचं स्केच मुंबई पोलिसांनी जारी केलंय.. पीडित मुलीच्या माहितीवरुन पोलिसांनी हे स्केच तयार केलंय.. सोमवारी हा आरोपी चोरीच्या उद्देशानं या मुलीच्या वांद्र्यातल्या इमारतीच्या घरात शिरला..

त्यानंतर चाकूचा धाक दाखवून त्यानं या मुलीवर बलात्कार केला.. शिवाय घरातील काही युरो आणि कॅमेराही चोरला..या मुलीनं स्वतःला वाचवण्यासाठी एका खोलीत स्वतःला कोंडून घेत आरडाओरडा केला.. तिचा आवाज ऐकून शेजारच्यांनी याची माहिती पोलिसांनी दिली..

त्यावेळी चोर खिडकीतून पसार झाला...याप्रकरणी सोमवारी संध्याकाळपर्यंत पोलिसांनी कसून चौकशी करत सात ते आठ संशयितांची चौकशी केली.. मात्र कोणतीही अटक करण्यात पोलीसांना यश आलं नाही..

First Published: Tuesday, November 6, 2012, 13:20


comments powered by Disqus