... आणि ती पुन्हा लिहू लागेल Ghatkopar rail Accident victim Monika More will get artificial hands s

... आणि ती पुन्हा लिहू लागेल

... आणि ती पुन्हा लिहू लागेल
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला आता लवकरच कृत्रिम हात बसवले जाणारेत. जर्मनीवरून पंधरा दिवसांमध्ये हे कृत्रिम हात येणार असून या हातांच्या माध्यमातून मोनिकाला हालचाल करणं शक्य होणार आहे.
मोनिका आणि तिचे कुटुंबिय सध्या आनंदात आहेत. कारण लवकरच मोनिकाला कृत्रिम हात बसवले जाणारेत.

11 जानेवारीच्या त्या घटनेनंतर त्यांच्या चेहऱ्यावरील हसू जणू गायबच झाले होते. रेल्वे अपघातात मोनिकानं दोन्ही हात गमावल्यानंतर उपचारासाठी आणि तिला कृत्रिम हात बसवता यावेत, यासाठी मुंबईबरोबरच देश-विदेशातून आर्थिक मदतीचा हात पुढे आला.

या आर्थिक मदतीतूनच खास जर्मनीहून ऑटोबोक कंपनीचा मायोइलेक्ट्रीक कृत्रिम हात मागवण्यात आला असून तो बसवण्यापूर्वी मोनिकाला सध्या काही व्यायाम करावे लागतायत. या कृत्रिम हातांच्या माध्यमातून मोनिकाला पूर्वीसारखं आपले काम करणं शक्य होणाराय. परंतु मोनिकाला पहिल्यांदा या कृत्रिम हातांच्या सहाय्यानं लिहायला आणि टायपिंग करायला शिकायचं आहे.

कृत्रिम हाताचा रंगही मोनिकाच्या त्वचेशी मिळताजुळता असणाराय. कृत्रिम हात बसवल्यानंतर मोनिकाला या हातांची योग्य ती काळजी मात्र घ्यावी लागणाराय.

मोनिकाला कृत्रिम हातांच्या सहाय्यानं जीवन सुखकर करता येईलही. परंतु मुंबईत रेल्वे प्रवासदरम्यान मोनिकासारखी वेळ दुसऱ्या कुणावर येवू नये म्हणून जे प्रयत्न होणं गरजेचे होते. ते दुर्देवानं होताना दिसत नाहीयत.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 10, 2014, 12:15


comments powered by Disqus