Last Updated: Thursday, January 16, 2014, 23:37
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई गेले अनेक दिवस गायब असलेल्या इस्टर अनुया या तरुणीचा मृतदेह भांडुपजवळ इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एका झुडुपात आढळलाय. अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडलेल्या या मृतदेहामुळे एकच खळबळ उडालीय.
अनुया मुंबईत ‘टीसीएस’मध्ये नोकरी करत होती. ती तिच्या गावाला विशाखापट्टणमला गेली होती. तिथून ती अंधेरीला रहात होती, तिथे पोहोचलीच नाही. तिच्या नातेवाईकांनी तिचा बराच शोध घेतला. पोलिसांतही तक्रार केली. तिच्या मोबाईल लोकेशनवरुन ती भांडुप परिसरात असल्याचं कळत होतं.
दरम्यान, पोलिसांनी सहकार्य केलं नाही, असा आरोप अनुया हिच्या कुटुंबीयांनी केला आहे. शेवटी तिच्या कुटुंबीयांनीच तिच्या मोबाईल लोकेशनवरुन शोधाशोध केली आणि तिचा मृतदेह शोधून काढला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 16, 2014, 23:33