Last Updated: Wednesday, January 15, 2014, 11:21
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मुंबई त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या चैत्यभूमीवर अंत्यसंस्कार होणार आहेत. आज दिवसभर वडाळ्यातील सिद्धार्थ हॉस्टेल इथं अंत्यदर्शनासाठी ढसाळ यांचं पार्थिव ठेण्यात येणार आहे.
साठोत्तरी मराठी कवितेतील एक प्रतिभाशाली दलित साहित्यिक आणि महाकवी नामदेव ढसाळ याचं निधन झालंय. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही काळापासून ढसाळ यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
`झी २४ तास`कडून नामदेव ढसाळांना भावपूर्ण श्रद्धांजली... आपणही आपली श्रद्धांजली येथे देऊ शकता. खाली दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या भावना... द्या ढसाळांना श्रद्धांजली..•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, January 15, 2014, 10:32