Last Updated: Friday, May 30, 2014, 12:02
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसोन्याच्या किंमतीत घसरण सुरूच आहे, कारण सोनं आता 27 हजाराच्याही खाली आलंय.
मुंबईच्या सराफ बाजारात सँडर्ड सोन्याचा भाव 200 रूपयांनी घसरला आहे.
मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 26 हजार 975 रूपयांवर आला आहे, बुधवारी हा भाव 27 हजार 175 रूपये होता.
वायदे बाजारातही आज सोन्याची किंमत 10 ग्रँमला 26 हजार 172 रूपये झाली आहे, स्टॉकिस्टकडून होत असलेल्या विक्रीमुळे ही घसरण झाली आहे.
दुसरीकडे राजधानी दिल्लीच्या सराफ बाजारात गुरूवारी सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे.
चांदीच्या किंमतीतही पाचव्या दिवशी घसरण दिसून आली, चांदीची किंमत 500 रूपयांनी घसरून चांदी प्रति किलो 40 हजार 500 रूपयांवर आलं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 30, 2014, 12:02