Last Updated: Thursday, May 22, 2014, 17:54
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईलग्नसराईत ज्यांना सोने खरेदी करायचं आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण सोन्याच्या भाव प्रतितोळा 815 रूपयांनी घसरला आहे.
सोन्याच्या दरात 2013 ऑगस्ट महिन्यात घसरण झाली होती, त्यानंतरची ही सर्वात मोठी घसरण असल्याचं सांगण्यात येत आहे.
सोने आयातीवर घातलेले निर्बंध रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शिथील केल्याने सोन्याच्या किमतीत घट झाली असल्याचं सांगण्यात येतंय.
भारतात एक तोळा सोन्याचा दर आता 27 हजार 900 रूपयांवर आलाय.
रिझर्व्ह बँकेने सोने आयात करणाऱ्या फर्मची संख्या 7 ने वाढवली आहे. यामुळे सोन्याची आयात करणे सोपे होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 22, 2014, 17:54