अरे वा सोन्याची किंमत अजून घसरली, GOLD PRICES FALL TODAY

अरे वा सोन्याची किंमत अजून घसरली

अरे वा सोन्याची किंमत अजून घसरली

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सोन्याची किंमत दिवसदिवस घसरत असून कालच्या तुलने सुमारे -०.७६ टक्क्यांनी सोन्यामध्ये घट दिसून आली. घाऊक बाजारात सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी २७,२५० तर २२ कॅरेटसाठी २५४७८ प्रति १० ग्रॅम झाली आहे. काल सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी २७,४६० तर २२ कॅरेटसाठी २५६७५ प्रति १० ग्रॅम असे होते.

सोन्याच्या किंमती किरकोळ बाजार आणि घाऊक बाजा यात नेहमी सुमारे १ हजार रुपयांचा फरक असतो. तुम्ही वर दिलेल्या किंमतीने बाजारात सोने खरेदी करायला गेलात तर तुम्हांला मिळणार नाही. कारण बाजारात व्हर्च्युअल चांदी आणि सोने वरील भावाने मिळते. पण प्रत्यक्ष चांदी आणि सोने घेताना यात सुमारे १ हजार रुपयांची तफावत आपल्या पाहायला मिळते.
अरे वा सोन्याची किंमत अजून घसरली



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 29, 2014, 16:55


comments powered by Disqus