Last Updated: Saturday, August 3, 2013, 16:33
<>www.42taas.com झी मीडिया, मुंबई
राज्यातल्या पोलीस अधिका-यांसाठी एक गुड न्यूज आहे. राज्यातील ८८३ पोलीस अधिका-यांच्या एकाचवेळी प्रमोशनसह बदल्या करण्यात आल्या आहेत.
अनेक दिवसांपासून रखडलेलं प्रमोशन मिळाल्यानं पोलीस अधिकारी कमालीचे सुखावले आहेत. गृह विभागानं एकाच वेळी २८२ पोलीस निरीक्षक आणि ६०१ पोलीस उपनिरीक्षकांच्या प्रमोशन देवून बदल्या केल्या आहेत. विशेष म्हणजे मागास प्रवर्गात मोडणा-या अधिका-यांचे प्रमोशन करतांना त्यांच्या जात पडताळणीबाबत खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जात पडताळणी झाली नसलेल्या अधिका-यांना कार्यमुक्त न करण्याचे आदेश देण्यात आलेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, August 3, 2013, 16:25