आता काढता येणार वर्षभराचा पास, पैसेही वाचणार Good News for Local passengers

आता काढता येणार वर्षभराचा पास, पैसेही वाचणार

आता काढता येणार वर्षभराचा पास, पैसेही वाचणार
www.24taas.com, मुंबई

लोकल प्रवास करणा-या रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. आता थेट सहा महिन्यांचा किंवा चक्क एका वर्षाचा पास काढण्याची सुविधा रेल्वेने उपलब्ध करुन दिली आहे. आणि असा पास काढल्यावर काही पैशांचीही बचत होणार आहे.

सहा महिन्याचा पास काढतांना एका महिन्याच्या पासाच्या 5.4 पटीत पैसे आकारले जातील. तर एक वर्षांच्या पासासाठी एका महिन्याच्या पासवर 10.8 पटीने पैसे आकारले जातील. सोप्या भाषेत सांगायचं तर एका महिन्याच्या पासची किंमत 100 रुपये गृहीत धरली, तर सहा महिन्यांच्या पासासाठी 600 रुपये नाही तर 100 गुणिले 5.4 असे 540 रुपये द्यावे लागतील. म्हणजे 60 रुपयांची बचत होईल.

तर एका वर्षाच्या पाससाठी 1200 ऐवजी 1080 रुपये द्यावे लागतील, 120 रुपयांची बचत होणार आहे. या सुविधा सुरु करतांना एक किंवा तीन महिन्याच्या पासची सुविधा कायम ठेवण्यात आली आहे.

First Published: Thursday, January 17, 2013, 21:14


comments powered by Disqus