Last Updated: Wednesday, May 28, 2014, 19:30
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबईकरांसाठी आता एक गूड न्यूज.. म्हाडानं घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतलाय. म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी नोंदणी करण्यासाठी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती.
मात्र इच्छुक अर्जदारांना आणखी संधी मिळावी म्हणून ऑनलाईन अर्जाची मुदत 9 जूनपर्यंत वाढवण्यात आलीय. तर 11 जूनपर्यंत बँकत अर्ज भरण्यात येणार आहेत.
म्हाडाच्या घरांची सोडत आता 15 ऐवजी 25 जूनला होणार आहे. एकूण 2641 घरांसाठी ही सोडत निघणार असून त्यापैकी 1716 सदनिका विरार-बोळिंजमध्ये, 111 सदनिका वेंगुर्ल्यामध्ये तर उरलेल्या 814 सदनिका मुंबईतील विविध भागांमध्ये आहेत..
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 28, 2014, 18:55