मुंडेंनी केली ‘आबां’ची स्तुती, ‘दादा’वर हल्ला!Gopinath Munde praise R.R. Patil on phone

मुंडेंनी केली ‘आबां’ची स्तुती, ‘दादा’वर हल्ला!

मुंडेंनी केली ‘आबां’ची स्तुती, ‘दादा’वर हल्ला!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना फोन करून त्यांचं कौतुक केलंय. गडचिरोलीच्या आदिवासींची वीज तोडू नये, अशी आग्रही भूमिका पाटील यांनी कालच्या कॅबिनेटमध्ये घेतली होती. त्याबद्दल मुंडेंनी आबांची प्रशंसा केलीये.

दुसरीकडे त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. अजित पवार हे पाटबंधारे विभागानंतर आता वीज क्षेत्राला लुटण्याचं काम करतायत, अशी टीका मुंडेंनी केलीय. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाजाला अंधारात ठेवू नका. दिवाळीमध्ये वीज तोडू नका अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

गृहमंत्र्यांच्या मागणीनंतर अजित पवारांनी त्यांची खिल्ली उडवल्याची चर्चा आहे. यावरही मुंडेंनी तोफ डागलीये. वीज दरवाढीलाही स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केलीये.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, October 31, 2013, 15:18


comments powered by Disqus