लतादीदींच्या घरबांधणीला सरकारचं कोर्टात आव्हानGovernment challenged Lata Mangeshkar`s housing scheme

लतादीदींच्या घरबांधणीला सरकारचं कोर्टात आव्हान

लतादीदींच्या घरबांधणीला सरकारचं कोर्टात आव्हान
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कोल्हापुरातील घरबांधणी योजनेला सरकारनं कोर्टात आव्हान दिलंय. मंगेशकर यांची जमीन कमाल नागरी जमीन धारणा कायद्याखाली अतिरिक्त ठरविण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी तिथं घरबांधणी योजना राबविण्याचं ठरविलं. मात्र, ही योजना राबविताना त्यांनी अटी पाळल्या नसल्याचं कारण देऊन सरकारनं त्यांना नुकतीच घरविक्री करण्यास मनाई केली. या निर्णयास मंगेशकर यांनी याचिकेद्वारं आव्हान दिलं आहे.

आता कमाल नागरी जमीन धारणा कायदाच अस्तित्वात नसल्यानं त्या कायद्याखाली संबंधित अधिकारी आपल्याला असे आदेश देऊ शकत नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे. मंगेशकर यांनी याप्रकरणी कोणत्या अटींचं उल्लंघन केलं आहे, असा प्रश्‍न खंडपीठानं विचारला. अर्जदारांनी सरकारच्या सर्व अटी पाळल्या असतील, तर त्यांना घरविक्रीस मनाई करता येणार नाही, असं मत खंडपीठानं व्यक्त केलं.

अर्जदारांनी घराच्या किमतीसंदर्भातील अटींचं पालन केलं नसल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं. तसंच, अर्जदारांनी केलेला अन्य अटींचा भंगही आपण पुढील सुनावणीच्या वेळी निदर्शनास आणू, असंही सरकारी वकील म्हणाले.

न्या. अभय ओक आणि न्या. सोनक यांच्या खंडपीठासमोर झाली. यासंदर्भात मंगेशकर यांनी अन्य काही अटींचं पालन केलं नसल्याची माहिती आपल्याकडे आहे. त्यासंदर्भात आपण अधिक माहिती घेऊन निवेदन करू, असं सरकारी वकिलांनी सांगितल्यानंतर खंडपीठानं सुनावणी तहकूब केली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 5, 2014, 11:16


comments powered by Disqus