Last Updated: Friday, August 10, 2012, 23:35
www.24taas.com, मुंबईठाण्यात दहीहंडी उत्सवादरम्यान एका गोविंदाचा मृत्यू झालाय. तर रायगड जिल्ह्यात थरावरुन पडून एका गोविंदाचा मृत्यू झालाय.
हंडी फोडताना विविध गोविंदा पथकातील शंभरावर गोविंदा जखमी झालेत. जखमी गोविंदांवर शहरातल्या केईएम, नायर, सायन आणि जेजे रुग्णालयात उपचार करण्यात आले. काही जखमी गोविंदावर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलंय.
काही जणांवर अजून उपचार सुरु आहेत. यातील दोन गोविंदाची प्रकृती चिंताजनक आहे. मुंबईतल्या विविध गोविंदा पथकातील हे गोविंदा आहेत.
First Published: Friday, August 10, 2012, 23:35