भुजबळांच्या चौकशीला सरकारचीच टाळाटाळ Govt avoids inquiry of Bhujbal

भुजबळांच्या चौकशीला सरकारचीच टाळाटाळ

भुजबळांच्या चौकशीला सरकारचीच टाळाटाळ

www.24taas.com, मुंबई

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी)ने एक धक्कादायक खुलासा केलाय.. राज्य सरकार सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची चौकशी करण्यास टाळाटाळ करत असल्याचं आता समोर आलंय. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून आलेल्या पत्रातून हा गौप्यस्फोट झालाय.

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी चौकशी करण्यासाठी एसीबीनं सरकारकडं परवानगी मागितली होती. मात्र तशी परवानगी मिळाली नसल्यानं भुजबळ यांची चौकशी करण्यात आली नसल्याचं एसीबीनं म्हटलंय.

महाराष्ट्र सदन बांधकाम निविदा प्रक्रियेत छगन भुजबळांनी घोटाळा केल्याची तक्रार किरीट सोमय्यांनी केली होती. महाराष्ट्र सदनाचं काम करणाऱ्या बांधकाम व्यवसायिक चमनकर यांना अतिरिक्त एफएसआय देत हजारो कोटींचा फायदा करून दिल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. हा सगळा घोटाळा दहा हजार कोटींहून जास्त असल्याचं म्हटलं जात आहे.

First Published: Thursday, September 13, 2012, 18:56


comments powered by Disqus