माजी नगरसेवकाच्या मुलाचा माज; चिमुरडीला गाडीखाली चिरडलं, Gurudas Kamat`s kin runs over 3-yr-old in Mumbai; arrested

माजी नगरसेवकाच्या मुलाचा माज; चिमुरडीला गाडीखाली चिरडलं

माजी नगरसेवकाच्या मुलाचा माज; चिमुरडीला गाडीखाली चिरडलं
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईत माजी नगरसेवकाच्या मुलाच्या गाडीनं एका चिमुरडीला चिरडलंय. रौनक देसाई असं चालकाचं नाव असून तो माजी नगरसेवक समीर देसाई यांचा मुलगा आहे. देसाई हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास यांचा भाचा आहे.

गोरेगावमध्ये ही घटना घडलीय. अवघ्या तीन वर्षांची चिमुरडी आपल्या कुटुंबियांसहीत रस्ता ओलांडत असताना असतानाच १९ वर्षांच्या रौनकनं तिला गाडीनं जोरदार धडक दिली. जमलेल्या घोळक्यानं रौनकला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी रौनकला अटक केलीय. याप्रकरणी त्याच्यावर सेक्शन ३०४ प्रमाणे निष्काळजीपणाने गाडी चालवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र, हा ‘ड्रंक एन्ड ड्राईव्ह’चा प्रकार आहे का याचा तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगिलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 18, 2013, 10:31


comments powered by Disqus