मित्राने शरीरसंबंधांसाठी जबरदस्ती... म्हणून केला खून guy killed his homosexual friend for attempting rape

मित्राने समलिंगी संबंधांसाठी जबरदस्ती केल्याने खून

मित्राने समलिंगी संबंधांसाठी जबरदस्ती केल्याने खून
www.24taas.com, मुंबई

दहिसर येथे मित्राने शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्यामुळे दुसऱ्या मित्राने त्याचा खून केला. मित्राने आपल्यावर शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली होती, नकार दिल्यावर त्याने मारहाणही केल्याचं आरोपी विद्यार्थ्याचं म्हणणं आहे.

बोरिवलीतल्या आयसी कॉलनीत राहाणाऱ्या रायन गोम्सने संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास आपला मित्र आलेक डिसुझा आपल्या नवागाव येथील घरी बोलावलं. सुरूवातीला साध्या गप्पा मारणाऱ्या रायनने नंतर आलेकसोबत शारीरिक चाळे करण्यास सुरूवात केली. आलेकने विरोध दर्शवताच रायनने आलेकला मारहाणही केली.

आलेकने आपला बचाव करण्यासाठी तेथील चाकू रायनच्या पोटात भोसकला. यानंतर रायनला भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तपासणीनंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं. आलेकने आपल्या कबुलीजबाबात आपल्यावर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचं म्हटलं आहे. आपला बचाव करण्यासाठी आपण रायनचा खून केल्याचं आलेकने म्हटलं आहे. आलेक बीएमएमचा विद्यार्थी आहे.

First Published: Wednesday, December 26, 2012, 19:29


comments powered by Disqus