Last Updated: Wednesday, August 28, 2013, 15:44
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईमालगाडीचे डबे घसरल्याने हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. ही सेवा पूर्ववत सुरू झाली आहे.
कुर्ला स्थानकाजवळ मालगाडीचे तीन डबे घसरल्याने या मार्गावरील रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता. १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान मालगाडी कुर्ला स्थानकातून निघाली होती. याचवेळी गाडी हार्बर मार्ग क्रॉस करून पुढे जात असताना मालगाडीचे तीन डबे घसरले. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
गाडीचे तीन डबे घसरल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक बंद झाली होती. याचा मनस्ताप चाकरमान्यांना सहन करावा लागत आहे. दरम्यान रेल्वे कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक तातडीने सुरळीत केली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.फोटोफीचर कुर्ला मालगाडी अपघात
First Published: Wednesday, August 28, 2013, 14:29