हार्बर मार्गावर लोकलच्या डब्याला आग , Harbour train compartment fire

हार्बर मार्गावर लोकलच्या डब्याला आग

हार्बर मार्गावर लोकलच्या डब्याला आग
www.24taas.com, मुंबई

मुंबईतल्या हार्बर मार्गावर लोकलच्या डब्याला आग लागली होती. डॉकयार्ड स्टेशनजवळ ही आग लागली. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. यात काही प्रवासी जखमी झालेत.

हार्बर मार्गावर सकाळी साडेअकराच्या दरम्यान लोकलच्या शेवटच्या डब्याला लागलेल्या आगीत चार जण जखमी झालेत. त्यांच्यावर तातडीने उपचार होण्यासाठी त्यांना जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त लोकल मुंबई सीएसटीकडे निघाली होती. यावेळी ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे.

अंधेरीकडून सीएसटीकडे चाललेल्या लोकलच्या डब्याला सकाळी अचानक आग लागली. आग लागल्याचं कळताच अनेक प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या टाकल्या. यात दहा प्रवासी जखमी झालेत.

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

First Published: Tuesday, December 4, 2012, 13:33


comments powered by Disqus