Last Updated: Thursday, January 10, 2013, 10:48
www.24taas.com, मुंबईमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर `अर्थकारणा`चे आरोप करून मनसेत आपली घुसमट होत असल्याचे सांगत कन्नड विधानसभेचे येथील मनसेचे अमदार हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे दिला. हर्षवर्धन जाधव यांच्या राजीनाम्यामुळे तसेच राज यांच्यावर केलेल्या थेट आरोपांमुळे मनसेत खळबळ उडाली असून गुरुवारी औरंगाबाद येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे.
मनसे सोडण्याची घोषणा यापूर्वीही आमदार जाधव यांनी केली होती. मात्र राज यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याचे टाळले. मात्र आज राज ठाकरे यांच्यावर थेट टीकेची तोफ डागतच हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मनसेला आठ जागा मिळाल्यनंतरही पक्ष प्रमुखाच्या संमतीने आर्थिक व्यवहार करून जिल्हापरिषद राष्ट्रवादीला दिल्याचा आरोपही त्यांनी केला. मराठवाडय़ात पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत आपल्याला कोणतेच स्थान नाही.
First Published: Thursday, January 10, 2013, 10:38