राज ठाकरेंचा विरोध डावलला; फेरीवाल्यांचा मोर्चा निघालाच!, hawkers andolan in mumbai

राज ठाकरेंचा विरोध डावलला; फेरीवाल्यांचा मोर्चा निघालाच!

राज ठाकरेंचा विरोध डावलला; फेरीवाल्यांचा मोर्चा निघालाच!
www.24taas.com, मुंबई

मुंबईतल्या फेरीवाल्यांनी आझाद मैदानात आज जोरदार आंदोलन केलं. सुमारे दोन हजार फेरीवाले या निदर्शनात सहभागी झाले होते.

एसीपी वसंत ढोबळे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध छेडलेल्या मोहीमेविरुद्ध हे आंदोलन करण्यात आलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही फेरीवाल्यांना मोर्चा न काढण्याची तंबी दिली होती. मात्र राज ठाकरेंना न जुमानता हजारो फेरीवाले आझाद मैदानावर जमले आणि पोलिसांच्या कारवाईविरोधात जोरदार निदर्शनं केली.

मोर्चा काढला तर फेरीवाल्यांना मनसे स्टाईल उत्तर देऊ, असा इशारा पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतरही हा मोर्चा निघालाच... त्यामुळे आता लक्ष लागलंय ते मनसेच्या भूमिकेकडे.

First Published: Thursday, January 24, 2013, 17:11


comments powered by Disqus