Last Updated: Tuesday, September 24, 2013, 08:13
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शक्तीस्थळाला मान्यता देण्यात आलीय. हेरिटेज कमिटीनं त्याला ग्रीन सिग्नल दिलाय. शिवाजी पार्कवरच्या जागेच्या वादावर त्यामुळे पडदा पडलाय.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर अंत्य़संस्कार झालेल्या शिवाजी पार्कमधल्या जागेवरच शिवसैनिकांनी चौथरा उभारला होता. याच ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारलं जावं, अशी इच्छा शिवसेनेनं व्यक्त केली होती. मात्र, शिवाजी पार्कवरील जागा केवळ बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारासाठी शिवसेनेला देण्यात आल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी कुरघो़डी साधण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर बाळासाहेबांच्या स्मारकाऐवजी शक्तीस्थळाची मागणी पुढे आली. त्यावर एकमत झाल्यानंतर आता ‘हेरिटेज कमिटी’चा ग्रीन सिग्नल मिळाल्यानं बाळासाहेबांच्या शक्तीस्थळाचा मार्ग मोकळा झालाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, September 24, 2013, 08:11