खूशखबर : आता घर घेणे शक्य, गृहकर्ज ९०% home loan limit may be increased

खूशखबर : आता घर घेणे शक्य, गृहकर्ज ९०%

खूशखबर : आता घर घेणे शक्य, गृहकर्ज ९०%

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई

तुम्हाला नवीन घर घ्यायचे आहे का? ते घेणे आता अधिक सोपे झाले आहे. नविन घरासाठी मिळणाऱ्या गृहकर्जात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही एक खूशखबर आहे. आता तुम्हांला घराच्या एकूण किंमतीतील ९० टक्क्यांपर्यंत गृहकर्ज मिळू शकते. राष्ट्रीय गृहनिर्माण बँक या प्रस्तावावर काम करत आहे.

या सुविधेअंतर्गत २० लाखापेक्षा अधिक कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना फायदा होणार आहे. या आधी बँक एकूण किंमतीच्या ८० टक्केचं कर्ज द्यायची. मात्र, यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे कर्ज देताना बँक एकूण किंमतीच्या कर्जाचा विचार करेल.

हे कर्ज हमी तारण ठेवण्याऱ्यांना लागू होईल. म्हणजेच मालमत्ता आरबीआयच्या रजिस्टर्ड असलेल्या कंपनीकडे गहाण ठेवावी लागेल. त्यामुळे गैरव्यवहार थांबतील, असे, राष्ट्रीय गृहनिर्माण बँकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर. व्ही. शर्मा यांनी सांगितले. त्यामुळे नविन नियमानुसार कोटी रुपयांचे घर खरेदी करणाऱ्याला ९० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 3, 2014, 14:50


comments powered by Disqus