www.24taas.com, home minister should resigned, bjp said

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - भाजप

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - भाजप
www.24taas.com, मुंबई
‘शनिवारी मुंबईतील सीएसटी स्टेशनवर झालेला हिंसाचार म्हणजे गृहमंत्र्यांचं अपयश’ असल्याची टीका करत भाजपनं महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

सीएसटी हिंसाचारानंतर विरोधक आक्रमक झालेत. याच मुद्द्यावर भाजपच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत रविवारीच हिंसाचाराची घटना ही गृहमंत्र्यांचे अपयश असल्याची टीका भाजप नेत्यांनी केलीय. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्याची मागणीही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली. तसंच मुंबई पोलीस आयुक्त आरुप पटनायक यांना निलंबित करण्याची मागणीही यावेळी करण्यात आलीय.

First Published: Sunday, August 12, 2012, 19:37


comments powered by Disqus