Last Updated: Monday, April 29, 2013, 11:49
www.24taas.com, झी मीडिया,मुंबईसेवाकर वसूल करण्यासाठी सरकारने पाऊल उचल्याने नागपूरनंतर मुंबईतही आज हॉटेल व्यवसायीकांनी कडकडीत बंद पाळलाय. आज हॉटेल व्यावसायिकांनी बंदची हाक दिलीये.
केंद्र सरकारने वातानुकुलीत हॉटेल्स आणि रेस्टॉरंटकडून १२.३६ टक्के सेवाकर वसूल करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाच्या निषेधार्थ आज राज्यभरातील हॉटेल्स बंद राहणार आहेत.
हॉटेलमधील खाद्यपदार्थांवर यापूर्वीच राज्य सरकारने साडेबारा टक्के मूल्यवर्धित कर लागू केलाय. आता पुन्हा केंद्राच्या माध्यमातून सेवाकर लागू केला जाणार असल्यानं खाद्य पदार्थांच्या किंमती वाढतील आणि हॉटेलिंग सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर जाईल अशी शक्यता हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केलीय.
देशातील इतर राज्यांप्रमाणे हॉटेल्सना पर्यटन व्यवसायाचा दर्जा देऊन करांमध्ये सवलत देण्याची मागणी होतेय.
First Published: Monday, April 29, 2013, 11:43