Last Updated: Saturday, June 7, 2014, 13:26
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई मुंबई मेट्रोच्या सीईओंनी जाहीर केल्यानंतर आता उद्या सकाळी 10 वाजता मुंबई मेट्रोचं उद्घाटन होणार आहे. मेट्रोचं भाडं कमीतकमी 10 रुपये तर जास्तीत जास्त 40 रुपये असेल, असंही सांगण्यात येतंय.
जाणून घ्या कशी आहे मुंबई मेट्रो एकूण 16 मेट्रो, साडे अठरातास सेवेत
दररोज 6 लाख प्रवाशी वाहतूक करण्याची क्षमता
चार एसी डब्बे, साडे तीन मिनिटांची फ्रिक्वेन्सी, मेट्रोचा वेग प्रतितास 80 किलोमीटर
दीड तासांचा प्रवास अवघ्या 21 मिनिटांत
सकाळी 5.30 ते रात्री 12पर्यंत मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत असेल
वर्सोवा - डी एन नगर - आझाद नगर - अंधेरी - प. द्रुतगती मार्ग - चकाला - विमानतळ- मरोळ - साकीनाका - सुभाषनगर - असल्फा –घाटकोपर हे स्टेशन्स
संगणकीय आणि स्वयंचलित तिकीट व्यवस्था
प्रत्येक डब्यात 50 प्रवाशांना बसण्याची, तर 375 प्रवाशांना उभं राहण्याची सोय
एका मेट्रोतून एकाच वेळेस 1500 प्रवासी प्रवास करू शकतात
वर्सोवा ते घाटकोपर प्रवासासाठी फक्त 21 मिनीटे
प्रत्येक स्टेशनवर अर्धा मिनीट म्हणजे 30 सेकंद थांबणार
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, June 7, 2014, 13:26