‘एटीएम’चं क्लोनिंग... काय आहे ही भानगड, how to prevent from atm cloning

‘एटीएम’चं क्लोनिंग... काय आहे ही भानगड

‘एटीएम’चं क्लोनिंग... काय आहे ही भानगड
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

ऑनलाईन ट्रान्सफरमधली असुरक्षितता लक्षात येते न येते तोच आता २४ तास काम करणारी एटीएमही असुरक्षित असल्याचं उघड झालंय. कुलाबा परिसरातल्या एटीएम मशीनमधून एटीएम-डेबिट कार्डचे क्लोनिंग करून ३७ जणांच्या खात्यातून तब्बल ३५ लाख इतकी रक्कम काढण्यात आलीय. विशेष म्हणजे, फसवणूक झालेल्यांपैकी १५ जण पोलीस आहेत. हे सर्व पैसे ग्रीसमधून काढण्यात आल्याचे समजतंय. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालीय. यासंबंधी पोलिसांकडे गुन्हा दाखल केला असून पोलीस याचा शोध घेत आहेत.

कसे केले जाते क्लोनिंग?
- कार्ड टाकलं जातं तिथं ‘स्क्रीमर मशीन’ लावली जाते.
- कार्ड मुख्य मशीनमध्ये जाताना कार्डामागील मॅग्नेटिक स्ट्रीप स्क्रीमर मशीनमध्ये स्कॅन होते.
- पिन नंबरच्या ठिकाणावर छुपा कॅमेरा असतो.
- स्क्रीमर मशीनमध्ये स्ट्रीप स्कॅन होते आणि त्याचवेळी पिन नंबर कॅमेर्याधत दिसतो.
- मॅग्नेटीक स्ट्रीपची नक्कल करून डुप्लीकेट कार्ड बनवलं जातं.
- कोणत्याही मशीनमध्ये हे कार्ड आणि पिन क्रमांक टाकल्यास पैसे काढता येतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 15, 2013, 17:15


comments powered by Disqus