पत्नीचा खून; शरीराचे तुकडे करून फ्रिजमध्ये कोंबले, husband kill wife, kept pieces of body in fridge

धक्कादायक : पत्नीचा खून; शरीराचे तुकडे करून फ्रिजमध्ये कोंबले

<B> <font color=red> धक्कादायक : पत्नीचा खून; शरीराचे तुकडे करून फ्रिजमध्ये कोंबले</font></b>
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

माणुसकीवरचा विश्वासच उडून जाईल, अशी घटना मुंबईजवळच मीरारोडमध्ये उघड झालीय. एका पतीनंच आपल्या पत्नीचा खून करून तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवल्याचं समोर आलंय. या घटनेनं आजुबाजूच्या परिसरासह पोलिसांनाही हादरवून सोडलं.

मीरारोडच्या गोल्डन नेस्ट परिसरात ही घटना घडलीय. गिरीश कोटे असं या क्रूर पतीचं नाव आहे. आपली पत्नी मधुवंती कोटे हिची गिरीशनं हत्या करून आपलं कृत्य लपवण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे त्यानं फ्रिजमध्ये लपवून ठेवले होते. २०११ साली मधुवंती आणि गिरीशचं लग्न झालं होतं. त्यांना दीड वर्षांचा एक मुलगादेखील आहे. गोल्डन नेस्ट परिसरातील नक्षत्र टॉवरमधल्या चौदाव्या मजल्यावर हे छोटंसं कुटुंब राहत होतं.

पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडत होतं. अशाच एका भांडणादरम्यान राग अनावर होऊन दोन दिवसांपूर्वी गिरीशने धारदार हत्यारानं पत्नी मधुवंतीची हत्या केली. त्यानंतर त्यानं क्रूर पद्धतीनं तिच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले... त्यानं मधुवंतीचं डोकं आणि धड फ्रीजमध्ये तर पायाचे भाग बेडरुममध्ये ठेवले होते.

मित्राच्या मदतीने गिरीशने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पण, त्याच्या मित्रानं ही बातमी पोलिसांना कळवल्यामुळं गिरीशचं बिंग फुटलं. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडेही ताब्यात घेतलेत तसंच गिरीशलाही अटक करण्यात आलीय. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.


व्हिडिओ पाहा -




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 4, 2013, 10:41


comments powered by Disqus