Last Updated: Thursday, November 7, 2013, 09:01
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईमुंबईतल्या वडाळा परिसरात एका भोंदू साधूचा पर्दाफाश करण्यात आलाय. महिलांना संमोहित करुन त्यांच्या गळ्यातल्या दागिने घेऊन हा साधू फरार होत असे... राजू चौगुले असं या भोंदू साधूचं नाव आहे...
साधूच्या वेशात हा भोंदू बाबा दीक्षा जाधव या महिलेच्या घरी आला. बाहेरची बाधा झाल्यानं सुख मिळत नसल्याचं सांगत त्यानं महिलेला भूलवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यापासून मुक्ती पाहिजे असल्यास गळ्यातली सोनसाखळी देवाजवळ ठेव असं त्यानं सांगितलं. त्याच्यावर विश्वास ठेवून दीक्षा जाधव यांनीही सोनसाखळी काढून ठेवली. त्यानंतर संमोहनाच्याआधारे त्यांना बेशुद्ध केलं आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र अचानक शुद्धीवर आलेल्या दीक्षा जाधव यांनी आरडाओरडा करत पळण्याच्या घाईत असलेल्या या भोंदू साधूची पोलखोल केली. पोलिसांनी या भोंदू साधूला अटक केलीय. तो नगर जिल्ह्यातला असून पनवेलच्या झोपडपट्टीत राहत असल्याचं समोर आलंय. यामागं कोणती टोळी आहे का याचा पोलीस तपास करतायत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, November 7, 2013, 09:01