`राज` मी नाही देणार `राजीनामा` - आर. आर, पाटील, I am not giving my resignation say r.r. patil

`राज` मी नाही देणार `राजीनामा` - आर. आर. पाटील

`राज` मी नाही देणार `राजीनामा` - आर. आर. पाटील
www.24taas.com, मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई हिंसाचारप्रकरणी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र `मी राजीनामा देणार नाही` असं उत्तर आर. आर. पाटील यांनी ठणकावून सांगितलं. राज ठाकरेंना गृहमंत्र्यांनी प्रत्युत्तर देत, राज यांच्या मोर्चावर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित झालेले आहेत, त्यामुळे माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असं गृहमंत्री म्हणाले. मुंबई हिंसाचाराविरोधात मनसेने आज गिरगाव ते आझाद मैदान असा मोर्चा काढला. त्यानंतर आझाद मैदानावर सभाही घेतली.

या सभेत राज यांनी तुफान फटकेबाजी केली. मुंबई हिंसाचाराची जबाबादारी स्वीकारुन गृहमंत्री आर आर पाटील आणि पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

First Published: Tuesday, August 21, 2012, 20:28


comments powered by Disqus