मला फक्त एकच धर्म समजतो, `महाराष्ट्र धर्म`- राज , I believe only Maharashtra Dhrama, say Raj

मला फक्त एकच धर्म समजतो, `महाराष्ट्र धर्म`- राज

मला फक्त एकच धर्म समजतो, `महाराष्ट्र धर्म`- राज
www.24taas.com, मुंबई

`मला फक्त एकच धर्म समजतो आणि तो म्हणजे `महाराष्ट्र धर्म`, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकच एल्गार केला. सीएसटीवर झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ मनसेने काढलेल्या मोर्चाच्या सभेत राज ठाकरे यांनी तुफान भाषणबाजी करत, घणाघाती हल्ला सरकार आणि पोलीस कमिशनर यांच्यावर केला.

पोलिसांवर हल्ले करता, म्हणून निषेध करण्यासाठी मोर्चा काढला तर राज लगेच हिंदुत्ववादी झाला काय? असा करडा सवालच राज ठाकरे यांनी केला. मराठी माणसांसाठी आणि माझ्या मराठी पोलीस बांधवांवर केलेल्या हल्यासाठी मी एल्गार केला आहे. असं राज ठाकरे यांनी सरकारला खणखणीत शब्दात सुनावले.

‘माझ्या पोलीस बांधवांसाठी हा मोर्चा काढलेला आहे’, ‘यापुढे पुन्हा असं काही झालं तर तुम्हाला आवाज देताच असेच आमच्या मागे उभे राहा’, अशी त्यांनी पोलिसांचं मनोधैर्य वाढविण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. कोणीही यावं आणि आमच्या पोलिसांना, मीडियावाल्यांना मारावं ही खेदजनक बाब आहे यापुढे मी तुमच्या पाठीशी मनसेची साथ तुम्हांला नेहमीच लाभेल असं म्हणत राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा खणखणीतपणे वाजवला.

First Published: Tuesday, August 21, 2012, 17:20


comments powered by Disqus