Last Updated: Saturday, January 19, 2013, 12:41
www.24taas.com, मुंबई शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर पोरक्या झालेल्या ‘शिवसेनेला एक पाऊल पुढेच नेईन’ असा संकल्प कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय. ते मुंबईत बोलत होते.
खासदार संजय राऊत यांच्या ‘युगान्त’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी पार पडला. याच कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरीही यावेळी उपस्थित होते. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर राऊत यांनी सामनातून केलेल्या लिखाणाचं संकलन ‘युगान्त’ या पुस्तकात करण्यात आलंय. पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आपल्या भक्कम नेतृत्वाचा विश्वास देताना ‘शिवसेनेला एक पाऊल पुढेच नेईन’ असं म्हटलंय.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी पालघर फेसबूक प्रकरणावरही भाष्य केले. पालघर प्रकरणातले अभिव्यक्ती स्वातंत्र्य वेगळे आणि महिला पोलीस अधिकाऱ्याने कवितेतून अभिव्यक्ती केली तर तिला माफी मागायला का लावता? असा सावल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. गडकरी आणि दाजी पणशीकर यांनीही शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा यानिमित्तानं दिला.
व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन टॅब ओपन करून खालील लिंक कॉपी-पेस्ट करा-
असे होते बाळासाहेब (भाग १) - http://goo.gl/V6sHs
असे होते बाळासाहेब (भाग २) - http://goo.gl/sKW3y
असे होते बाळासाहेब (भाग ३) - http://goo.gl/nacrQ
असे होते बाळासाहेब (भाग ४) - http://goo.gl/Nq8Iu
First Published: Saturday, January 19, 2013, 07:44