यूपीएचे सीबीआयवर नियंत्रण- नरेंद्र मोदी, IB, CBI or RAW, no organisation can be used against me: Narendra Modi

यूपीएचे सीबीआयवर नियंत्रण- नरेंद्र मोदी

यूपीएचे सीबीआयवर नियंत्रण- नरेंद्र मोदी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रुपया हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये आहे. रुपयाचे मूल्य सुधारले जाईल असे यूपीए सरकार म्हणते आहे, पण सरकारचा कशावरच कंट्रोल नाही. सरकारचा फक्त सीबीआय आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटवर कंट्रोल असल्याची घणाघाती टीका आज भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मुंबई केली.

मुंबईत हिरा व्यापाऱ्यांचा कार्यक्रमात ते बोलत होते. देशाची जनता आता यूपीए सरकारसोबत जाण्यास तयार नाही. देशाला बदल हवा आहे. देशात मोठ्या प्रमाणात संकट आहेत, पण सरकारचे कशावरच नियंत्रण नाही. फक्त सरकार सीबीआय आणि आयकर खात्यावर नियंत्रण आहे. आता माझा कोणी सत्कार केला कोणी हात मिळविला याचा व्हिडिओ पाहिला जाईल आणि मग इन्कम टॅक्सच्या धाडी पडतील, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.

स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त टीका, शिव्या मला पडल्या आहे. तरीही देशातील जनतेचा माझ्यावरील विश्वास कमी झालेला नाही. इतक्या आरोपांनंतरही जनतेने माझी साथ सोडली नाही. माझ्याकडूनही काही गोष्टी राहिल्या असतील पण माझ्या हेतुवर जनतेने कधी संय़श केला नाही.

या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांची चांदीने तुला करण्यात आली. यावेळी ही चांदी मी माझ्या घरी नेणार नाही, तर ती गुजरातमध्ये सरदार पटेल यांचे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर स्टॅच्यू ऑफ युनिटी हे स्मारक तयार करणार आहे. त्यासाठी हा पैसा वापरण्यात येणार आहे. अमेरिकेतील पुतळ्याच्या दुप्पट पुतळा सरदार पटेलांचा असणार आहे. मी कधी छोटा विचारच करीत नाही, असे मोदी यांनी सांगितले.

मोदी सिंहासनावर, उद्धव ठाकरे सोफ्यावर
या वेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. कार्यक्रमात मोदींना सिंहासन होते पण उद्धव ठाकरे मात्र सोफ्यावर बसले होते.

भरत शहा, मुंडेच्या शेजारी
या कार्यक्रमात अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप असलेले हिरा व्यापारी भरत शहा हे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या शेजारी बसले होते.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, September 30, 2013, 20:08


comments powered by Disqus