मुख्यमंत्र्यांचा फ्लॅट अनधिकृतरित्या भाड्याने, Illegal tenant of Prithviraj Chavan`s flat in Mumbai

मुख्यमंत्री चव्हाण यांचा फ्लॅट अनधिकृतरित्या महिलेला भाड्याने

मुख्यमंत्री चव्हाण यांचा फ्लॅट अनधिकृतरित्या महिलेला भाड्याने
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वडाळ्याच्या एका सोसायटीतला फ्लॅट अनधिकृतरित्या एका महिलेला भाड्याने दिला आहे. सध्या ती महिला त्या सोसायटीतल्या लोकांना त्रास देत असल्याची माहिती आहे.

भक्ती पार्क या वडाळ्यातल्या इमारतीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काही वर्षांपूर्वी सीएम कोट्यातून एक फ्लॅट मिळाला आहे. त्या फ्लॅटमधे सध्या स्नेहा पुजारी नावाची महिला राहात आहे. ही महिला आम्ही मुख्यमंत्र्यांचे खास आहोत, आमचं कोणी काही बिघडवू शकत नाही, अशा धमक्या देत आहे.

सोसायटीच्या मेंबर्सनी याविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी हा फ्लॅट कोणाला भाड्याने देत असल्याची माहिती सोसाय़टीला दिली नव्हती, अशी माहिती सोसाय़टी मेंबर्सनी दिली आहे. विशेष म्हणजे याच सोसायटीत हुसैन दलवाई यांचाही फ्लॅट आहे. त्या फ्लॅटमधेही सध्या एक भाडेकरू राहात आहे. त्याच्याही विरोधात सोसायटीने तक्रार दाखल केली आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.


First Published: Friday, October 11, 2013, 11:50


comments powered by Disqus