पोलिसांना चकवा देऊन ‘आयएम’चा दहशतवादी फरार, IM operative Afzal Usmani escapes from court in Mumbai

पोलिसांना चकवा देऊन ‘आयएम’चा दहशतवादी फरार

पोलिसांना चकवा देऊन ‘आयएम’चा दहशतवादी फरार

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबई सेशन्स कोर्टात आज एक धक्कादायक घटना घडलीय. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा अफजल उस्मानी हा दहशतवादी फरार झालाय.

इंडियन मुजाहिद्दीनच्या मीडिया सेलचा अफजल हा प्रमुख कार्यकर्ता आहे. अफजल हा सूरत-अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील सूत्रधार होता. त्याला मुंबई क्राईम ब्रांचने २००८ साली नवी मुंबई येथून अटक केली होती. अफजल उस्मानीसह इंडियन मुजाहिद्दीनच्या २३ सदस्यांवर आरोप निश्चित करण्यात येणार होते. त्यासाठी या सगळ्यांना सत्र न्यायालयात आणण्यात आलं होतं.

दुपारच्या जेवणानंतर शतपावली करण्यासाठी अफजलला न्यायालयाच्या आवारात सुरक्षेसह फिरवलं जात होतं. मात्र, संधी साधत अफजलनं सुरक्षा रक्षकांना चकवा देत न्यायालयातूनच पळ काढला.

अफजल न्यायालयाच्या परिसरातच लपल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी ठिकठिकाणी लावलीय. त्याचबरोबर संपूर्ण मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात आलाय. अफजलला शोधण्यासाठी काही टीम बनवण्यात आल्यात. पण, या घटनेमुळे मुंबई पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, September 20, 2013, 18:18


comments powered by Disqus