चोरीच्या घटनांमध्ये वाढ, तीन चोऱ्या, Increase in cases of theft, three theft

चोरीच्या घटनांमध्ये वाढ, तीन चोऱ्या

चोरीच्या घटनांमध्ये वाढ, तीन चोऱ्या
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबई आणि उपनगरांत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दिवसाढवळ्या चोऱ्या होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिसांची वचक नसल्याने असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी संतप्त नागरिकांच्या आहेत. मुंबई, पनवेल आणि डोंबिवलीत तीन वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडल्यात.

१) डोंबिवलीत चोरट्यांनी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून सहा किलो सोनं लंपास केलं. सुमारे दोन कोटींचे हे सोनं होतं. कस्तुरी प्लाझा येथील राजरत्न या ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा ही घटना घडली आहे. सीसीटीव्ही बंद असल्यानं चोरांना पकडण्याचं मोठं आव्हान आहे. राजरत्न ज्वेलर्स मालक भरत जैन यांनी दुपारी जेवणाकरता दुपारी २ ते ४ यावेळेत दुकान बंद ठेवले होते. याच कालावधीत चोरट्यांनी दुकानाच्या वरील भिंतीला भगदाड पडून चोरी केली.

2) जसलोक हॉस्पिटलमध्ये चोरी प्रकरणी कांती विलास या सफाई कर्मचा-याला अटक करण्यात आलीये. नव-याच्या उपचारासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील साडेतीन लाख रुपये किंमतीचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला गावदेवी पोलिसांनी अटक केलीये. हॉस्पिटलच्या 11 वा मजल्यावर ही घटना घडली होती. महिलेच्या पर्समध्ये साडे तीन लाख रुपयांचे दागिने होते. ती काहीकामानिमित्त हॉस्पिटल मधून बाहेर गेली असताना पर्सची चोरी झाली. चौकशी केल्यानंतर आरोपी कांतीने गुन्हा कबुल केला. त्याच्या घरातून पोलीसानी दागिने जप्त केले.

3) पनवेल मध्ये सोन्याच्या साखळीसाठी चोरांनी एकाची हत्या केल्याचा घटना घडली. पनवेल ग्रामीण पोलिसांना 48 तासात या प्रकरणी 4 आरोपींना अटक केली. पनवेल मधील बारवाई गावातील गजानन गायकर याची हत्या झाली होती. अनिल म्हस्के, अमोल लांडगे, देहु वाघमारे आणि राम वाघमारे अशी आरोपींची नावं आहेत. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी याआधीही चोरीचे गुन्हे केले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 3, 2014, 09:01


comments powered by Disqus